You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन- २०२२/२३ संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन- २०२२/२३ संपन्न

वैभववाडी

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई, संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी आणि विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २०/१२/२०२२ रोजी *”अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन 2022-2023″* संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे विश्वस्त श्री. प्रभानंद रावराणे, विश्वस्त श्री.सदानंद रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे व प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. भूषण लांगी सदस्य, विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांना कन्व्हेन्शन मधील नियमांची सविस्तर माहिती दिली. सिंधुदुर्ग विभागांमधून एकूण ८१ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये वैभववाडी महाविद्यालयातील कु. मृणाली पाटील व कु. सुधांशू तांबे यांची पुढील लेव्हलसाठी निवड झाली आहे. यासाठी प्रा.विजय शिंदे व प्रा.ओमकार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था व महाविद्यालयातर्फे निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्हा समन्वयक डॉ. डी.एम.सिरसट यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. दीपक शिरगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. प्रा. एन.ए. कारेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा