चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण यांनी केले आ.राणेंचे अभिनंदन..
कणकवली
देवगड, वैभववाडीसह कणकवली मतदार संघात जास्तीत जास्त भाजपाचे सदस्य निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार्या आमदार तथा भाजपाचे युवा नेते नितेश राणे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले.
यावेळी श्री. राणे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा विजय मिळाला आहे. भविष्यात जिल्ह्याला निधी मिळवून देण्यासाठी आमची आग्रही भूमिका असेल, अशी भूमिका यावेळी दोघांनी मांडली. श्री.राणे यांनी दोन्ही मतदार संघात भाजपाचे ८३ सरपंच व सदस्य निवडून आणले आहेत. श्री. राणे आज विधानसभेत पोहोचल्यानंतर उपस्थित नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत राणेंसह त्यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.