You are currently viewing राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्यात

राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्यात

उद्योजक व उमेदवारांनी सहभाग घ्यावा

– सहायक आयुक्त सुनिल पवार                            

सिंधुदुर्गनगरी

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी Stat Leval ” MEGA JOB FAIR ”   राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन, सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

     कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राज्यातील तसेच जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन  Stat Leval ” MEGA JOB FAIR ”  चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर  पंडित दिनदयाळ उपाध्याय स्टेट लेवल ” MEGA JOB FAIR ”  मध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वत:च्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन ॲप्लाई करावे. अधिक माहितीसाठी 0232- 228835, 9403350689 या क्रमांकावर अथवा ईमेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 11 =