देशातील टॉप २५ खासदारांच्या यादीत निवड झाल्याबद्दल खा.विनायक राऊत यांचा आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार

देशातील टॉप २५ खासदारांच्या यादीत निवड झाल्याबद्दल खा.विनायक राऊत यांचा आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत हे दुसऱ्यांदा लोकप्रिय खासदार ठरले आहेत. फोम इंडिया-एशिया या फोमच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या देशातील टॉप २५ खासदारांच्या यादीत खा.विनायक राऊत यांचा समावेश आहे.याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन खा.विनायक राऊत यांचा सत्कार केला.

याप्रसंगी शिवसेना नेते संदेश पारकर ,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ पं.स. उपसभापती जयभारत पालव,तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, आंब्रड विभाग प्रमुख विकास राऊळ, आबा मुंज, प्रवीण भोगटे, सुशील परब, पप्या राऊत, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा