You are currently viewing सिंधुदुर्गात आढळला विदेशी पक्षी..

सिंधुदुर्गात आढळला विदेशी पक्षी..

देवगड :

देवगड तालुक्यातील मुणगे येथे अबुधाबी असे लिहिलेली रिंग पायात असलेला पक्षी आढळला आहे. विशेषतः हा पक्षी कोणत्या जातीचा आहे कुठल्या अभ्यासासाठी सोडला आहे. याबाबत अद्यापही माहिती उपलब्ध होत नाही. मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बाभुळकर यांच्या घराजवळ हा पक्षी येऊन बसला होता. त्यांनी या पक्षाला ताब्यात घेऊन वनविभागाकडे सोपवले आहे.

हा पक्षी राखाडी रंगाचा असून कोणत्या जातीचा आहे. याबाबत वनविभागालात उलगडा होत नाही. देवगड मधील मानद जीव संरक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी यासंदर्भात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी या संस्थेला संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. या पक्षाच्या पायात रिंग असून त्यावर असलेला मजकूर डीकोडींग करता येत नाही. मात्र अबुधाबी लिहिले आहे. एवढे उघड झाले आहे असे पक्षी विविध अभ्यासासाठी सोडले जातात या पक्षाबाबत पुढील एक-दोन दिवसात गुढ उलघडेल असे दप्तरदार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा