सावंतवाडी
शहरात आज पुन्हा एकदा पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पकड मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. याबाबतची मागणी सामाजिक बांधिलकी संघटना व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानकडून राजू मसुरकर व रवी जाधव यांच्याकडून करण्यात आली होती. आता ही मोहीम राबविण्यात आल्यामुळे या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे आभार मानले.