You are currently viewing कणकवली तालुक्यात ६८ टक्के मतदान… 

कणकवली तालुक्यात ६८ टक्के मतदान… 

५२ ग्रामपंचायती मधील सरपंच आणि सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कणकवली:

कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी आज सरासरी ६७ टक्के मतदान झाले. यात कलमठ गावडेवाडी येथील मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत झाली तर काजिर्डे आणि नाटाळ येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना काही काळ थांबावे लागले होते.

कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी ११८ तर ३५२ सदस्य पदासाठी ७३५ सदस्य रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद असून ते २० तारीखेला चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा