इचलकरंजी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शरद सुखटणकर
इचलकरंजी /प्रतिनिधी
येथील इचलकरंजी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शरद सुखटणकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय काकडे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी रविकिरण चौगुले यांची तर खजिनदारपदी अरुण वडेकर यांची निवड करण्यात आली.
इचलकरंजी प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत सदर निवडी एकमताने करण्यात आल्या.अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष संजय कुडाळकर होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे ,संजय कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.तसेच मावळते अध्यक्ष संजय कुडाळकर यांनी मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नूतन कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी शरद सुखटणकर यांची, उपाध्यक्षपदी अजय काकडे यांची, सचिवपदी रविकिरण चौगुले, खजिनदारपदी अरुण वडेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर नूतन पदाधिका-यांचा पत्रकार दयानंद लिपारे, संजय खूळ, संजय कुडाळकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या
पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नूतन अध्यक्ष शरद सुखटणकर , उपाध्यक्ष अजय काकडे यांच्यासह अन्य नूतन पदाधिका-यांनी पुढील वर्षभराच्या कालावधीत पत्रकार बांधवांच्या विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून विविध कार्यक्रम राबवू, अशीही ग्वाही दिली. या बैठकीस सदस्य मयुर चिंदे , शैलेश चव्हाण, संतोष काटकर, सागर बाणदार, पद्माकर खुरपे , कृष्णात लिपारे ,सचिन चौगुले , अमर
चिंदे आदी उपस्थित होते. शेवटी अरुण काशीद यांनी आभार मानले.