You are currently viewing पुज्यनिय श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त गीत

पुज्यनिय श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त गीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पुज्यनिय श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त गीत.*

समाधी मंदिरात नंदादीप तेवतो निवांत
महाराज आसुशी ने भक्तांची वाट पहात।।ध्रु।।

बुवांनी पादुका स्थापिल्या सुरु केली पुण्यतिथ
समजावती महाराज आहेत पादुका रूपात
उत्सव करावा पुण्यस्मरण व्हावे गुरूंचे सतत।।1।।

अंतकाळी महाराज श्रीरामास आर्जवित
सर्व भक्तांना सहृदये सांभाळावे सांप्रत
पसायदान मागती नाम स्फुरावे हृदयात।।2।।

अव्याहत चाले अन्नदान जन संतृप्त होतं स्वच्छता शुद्धता शांती शिस्त नित्य नांदत
क्षेत्र पंच सेवेकरी निष्काम सेवा करीत।।3।।

समाधी पाहून सात्विक आनंद प्रत्यय येत
श्री महाराजांचा वास जाणवे कणाकणांत
विश्वातील विश्वासार्ह स्थान असे हे जागृत।।4।।

गुरुकृपा होई सर्वांवर मिळे नाम प्रसाद
कोट्यान कोटी जप होई संकल्प सिद्ध
विश्वातील श्रद्धा स्थान अशी गोंदवलेची ख्यात।।5।।

महाराजांचे नाम जपे चैतन्य जाणवत
महाराज रुपे अनुर्वाच्य ब्रह्मचैतन्यास येत
अर्पूया फुले गुलाल श्रींना पुण्यतिथी निमित्त।।6।।

काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन. 410201, Cell.9373811677.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =