दिवाळी पुर्वी कुडाळ मधील बस स्थानक सुरु करा…..

दिवाळी पुर्वी कुडाळ मधील बस स्थानक सुरु करा…..

अन्यथा मनसे भरवणार बस स्थानकच्या जागेत क्रिकेट स्पर्धा….

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी

कुडाळ

कुडाळ बस स्थानक इमारतीच काम पूर्ण झालेल असुन अजूनही ते धुळ खात पडले आहे. तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून या कुडाळ बस स्थानकाची इमारत बांधण्यात आली आहे. परंतु अद्याप या बस स्थानकावर बस सेवा सुरळीत चालू करण्यात आलेली नाही. रात्रीचे या बसस्थाकावर अवैध्य धंदे चालू असतात व सकाळी या बसस्थानकावर गाई, म्हशींचा वावर जास्त दिसतो त्यामूळे हे अडीच कोटीच बस स्थानक आहे की अडीच कोटीचा गोठा बांधून ठेवला आहे हे समजण कठीण होऊन बसलं आहे असं वक्तव्य मीडियाशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष J. D. उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिली आहे. तसेच या बस स्थानकावर अनधिकृत रित्या गाड्यांची पार्किंग केली जाते त्यामूळे हे सगळ थांबवण्यासाठी लवकरात लवकर दिवाळी पुर्वी कुडाळ मधील बस स्थानक सुरु करा, अन्यथा मनसे बस स्थानकच्या जागेत क्रिकेट स्पर्धा व अशा अनेक स्पर्धांच आयोजन करून त्या स्पर्धा भरवणार असा खोचक इशारा J.D उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिला आहे. तसेच एसटी प्रशासनाने पैशाची माती केली अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष J.D उर्फ बनी नाडकर्णी यांनी यावेळी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा