आमदार नितेश राणे यांनी केली होती सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी: शासनाकडून आदेश जारी
कणकवली
कणकवली तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून, या कार्यालयाचा प्रशासकीय पातळीवर उल्लेख सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ, मुक्काम कणकवली असा करण्यात आला होता. मात्र या कार्यालयाच्या अखत्यारीत कणकवली, देवगड, वैभववाडी हे तीन तालुके येत असून, कुडाळ तालुक्याचा समावेश सावंतवाडी विभागीय कार्यालयामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या नावामध्ये बदल करत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ मुक्काम कणकवली ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली असा उल्लेख करावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून, राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे नामाभिदान कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली करण्यात आले आहे. मात्र या विभागाच्या कार्यक्षेत्रात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची या शासन आदेशात म्हटले आहे.