You are currently viewing मिलाग्रीस हायस्कूलच्या अमूल्य घाडीची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड…

मिलाग्रीस हायस्कूलच्या अमूल्य घाडीची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड…

मिलाग्रीस हायस्कूलच्या अमूल्य घाडीची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड…

सावंतवाडी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोलीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या अमूल्य अरुण घाडी याने सहावा क्रमांक पटकावला असून त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालदान्हा यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव केला व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो ,पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा