You are currently viewing तळवणे येथील तरुणांचा मनसे पक्षात प्रवेश

तळवणे येथील तरुणांचा मनसे पक्षात प्रवेश

मनविसे जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश

सावंतवाडी

मनविसे जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजित पोळजी यांच्या मार्गदर्शनाखाली तळवणे येथे तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला.

अजित पोळजी यांच्या मार्गदर्शनाखाली तळवणे येथील नमेश गावडे, ललित परब, अक्षय गावडे, अमरेश गावडे, नितीन गावडे, गजानन परब, समीर पोळजी, मनीष वैज, सुरेश पोळजी, विकास पालव, सचिन पांगम, ओमकार तळवणेकर, हर्षद तळवणेकर, अर्जुन पोळजी, बाबू, गौरेश पालयेकर, सत्यजित गावडे, राजू आरोलकर, संतोष गोडकर, जनार्दन नाईक, सिद्धेश भगे, चिंतामणी खोत, विकास साटेलकर, राहुल खरात, शुभम बोंद्रे, गुणाजी मुळीक, शुभम नार्वेकर, अमित पोळजी, भूषण गावडे, राकेश सातार्डेकर आदी तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड. अनिल केसरकर, मनविसे जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, सतीश आकेरकर, साहील तळकटकर, महेंद्र कांबळी, सिध्देश सावंत आदी उपस्थित होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या मनात मनसे बद्दल आदर आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मनसे पक्षात जोरदार पक्ष प्रवेश होत आहेत. या प्रवेशावेळी तळवणे आणि पंचक्रोशीतील गावातील विविध समस्यावर विचार विनिमय करून या समस्यानवर एकमताने आणि एकत्र राहुन लवकरात लवकर प्रश्न सोडवू आणि मनसे पक्ष मजबुत आणि राज ठाकरेंचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी सर्वतोपरी काम करू असे आश्वासन सर्व मनसे कार्यकर्त्यांकडून प्रवेशावेळी देण्यात आले. त्यांना पक्षवाढीचे काम करतेवेळी काय अडचण येत असेल तर मनसे पक्षाकडून पदाधिकारी वर्गाकडून मदत करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − sixteen =