जंम्पच्या नेटवर्क बॉक्सचे वितरण येत्या मार्च पूर्वी सुरू होणार…

जंम्पच्या नेटवर्क बॉक्सचे वितरण येत्या मार्च पूर्वी सुरू होणार…

हर्षवर्धन साबळे यांची माहीती; जिल्ह्यात कंपनीच्या माध्यमातून “फ्री” वायफाय..

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय महत्वाकांक्षी ठरणारे “सेट टॉप बॉक्सचे” वितरण येत्या मार्च २०२१ पूर्वी सुरु होईल,अशी माहिती जम्प नेटवर्कच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांनी दिली आहे. श्री.साबळे म्हणाले कि कोरोनामुळे थोडा उशीर झाला.पण आता येत्या काही महीन्यात जिल्ह्यात फ्रि वाय फाय असेल. त्यासाठी लागणारे सेटटॉप बॉक्स बनविण्यात लवकरच सुरवात होत असुन जिमखाना येथे ऑफिस ही सुरू केले असल्याचे सांगितले.
माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा