You are currently viewing नागवेत भाजपला बाळासाहेबांची शिवसेना गटाचा धक्का

नागवेत भाजपला बाळासाहेबांची शिवसेना गटाचा धक्का

सौ. सायली संतोष जाधव यांचा ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

 

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील नागवे गावातील सरपंच पदासाठी भाजपने उमेदवारी नाकारल्याने सौ. सायली संतोष जाधव यांनी ब्रि. सुधीर सावंत यांच्या उपस्थित बाळासाहेबांच्या शिवसेनेते प्रवेश केला.

सौ. जाधव या पूर्वी भाजप पक्षात होत्या. त्यांची सरपंचासाठी उमेदवारी नाकारल्यामुळे सौ. जाधव यांनी अपक्ष उमेदवारी भरून त्यांनी आज ब्रि. सुधीर सावंत यांच्या उपस्थित बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला.

यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांसमवेत महेंद्र सावंत, सुनील पारकर, प्रमोद सांगवेकर, सौ. सांगवेकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 20 =