You are currently viewing लंपी आजाराने कुडाळ तालुक्यात ६ गुरे दगावली

लंपी आजाराने कुडाळ तालुक्यात ६ गुरे दगावली

कुडाळ

कुडाळ तालुक्यामध्ये लंपी आजाराने ६ गुरे दगावली आहेत. दगावलेल्या गुरांच्या मालकांना मोबदला मिळणार असून त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले आहे. दरम्यान कुडाळ तालुक्यामध्ये लंपी आजारापूर्वी लसीकरण झाल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला नाही.

सध्या महाराष्ट्रामध्ये गुरांना होणाऱ्या लंपी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे गुरे दगावत आहेत. कुडाळ तालुक्यामध्ये गाय, बैल अशी मिळून १० हजारावर गुरे आहेत. या प्रजातीतील गुरांना लंपी आजार होतो. या आजारामध्ये वेळेवर उपचार झाले. नाही तर गुरे दगावण्याचा संभव असतो कुडाळ तालुक्यांमध्ये लंपी आजारापूर्वी लसीकरण झाल्यामुळे तालुक्यात सुमारे १५० गुरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला. आणि या आजारामध्ये सुमारे ६ गुरे दगावली आहेत शासनाने लंपी आजारामध्ये दगावणाऱ्या गुरांच्या मालकांना मोबदला देण्याचे जाहीर केल्यामुळे या ६ गुरांच्या मालकांचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आले आहे कुडाळ तालुक्यात लंपी आजाराने गुरे दगावली जाऊ नयेत म्हणून पशुवैद्यकीय विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा