You are currently viewing सावंतवाडी येथे हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन संपन्न

सावंतवाडी येथे हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन संपन्न

सावंतवाडी:

आज सावंतवाडी येथील नारायण मंदिर हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या “हातमाग व यंत्रमाग” कपडाच्या भव्य प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ मोठ्या दिमाखात करण्यात आला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सावंतवाडीकरांसाठी खास सोलापुरी कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर विशेष म्हणजे या प्रदर्शनात कोणत्याही खरेदीवर तब्बल २०% पर्यंतची सूट मिळणार आहे. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदर्शनाच्या प्रमुखांकडून करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन आज धार्मिक पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पांडुरंग पोतन, पुरुषोत्तम पोतन, लक्ष्मण उडता, दिपक गुंडु, अशोक जानकी, सुदर्शन दुस्सा आदी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या कॉटन साडी, लिनन, साडी खादी साडी, इरकल माडी, सोलापूर चादर, बेडशिट, सतरंगी, टॉवेल पंचा, खादीशर्ट, कॉटन शर्ट, बंडी, कुर्ता, लेडीज बॅग, लेगीन्स, गाऊन, ऑलहॅगींग, ड्रेस मटेरियल, ईश्कल ड्रेस मटेरियल असे विविध प्रकार विक्री साठी ठेवण्यात आले आहेत. सली व खादी कापडाच्या विक्रीवर 20% टक्के सूट ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाचा सावंतवाडीकरांनी लाभ घ्यावा. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा