You are currently viewing भाजीच्या आडून गुटखा वाहतूक करणा-या रॅकेटचा कुडाळात पर्दाफाश…

भाजीच्या आडून गुटखा वाहतूक करणा-या रॅकेटचा कुडाळात पर्दाफाश…

एलसीबीची कारवाई; चौघे ताब्यात,१ लाख ६८ हजारच्या गुटख्यासह १४ लाखाच्या दोन गाड्या जप्त…

कुडाळ

भाजीच्या आडुन गुटखा वाहतूक करणा-या रॅकेटचा कुडाळ येथे पर्दाफाश करण्यात आला. काल रात्री उशिरा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले.यात कुडाळातील दोघा बड्या व्यावसायिकांचा समावेश आहे.
या प्रकरणात संशयितांकडून १ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या गुटख्यासह १४ लाखाच्या दोन गाड्या, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष मनोहर शिंदे( रा. बेळगांव), रुपेश विष्णू माने (रा. बेळगांव), रवींद्र गजानन ढवण (रा.पवाशी- कुडाळ), दत्ता उर्फ सुशील गुरुनाथ पडते (रा.कुडाळ बाजारपेठ),अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक देसाई, श्री.शेळके यांच्यासह सुधीर सावंत,प्रवीण वालावलकर, अनिल धुरी, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर,आशिष गंगावणे, संदीप नार्वेकर, अजित पालकर, ज्ञानेश्वर कांदळकर आदींनी ही कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =