*कवी गझलकार विजो (विजय जोशी) यांच्या “वृत्तबद्ध कविता ते गझल” (तंत्र आणि मंत्र) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १८ डिसेंबरला डोंबिवलीत*
*महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या डोंबिवली शाखेचे आयोजन*
प्रख्यात कवी गझलकार विजो या नावाने ज्ञात असणारे श्री.विजय जोशी यांच्या “वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता वक्रतुंड सभागृह, तिसरा मजला, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली(पू.) येथे ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे व ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. वामनराव देशपांडे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडत आहे. सदरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), शाखा डोंबिवलीने केले आहे.
कवी गझलकार विजो (विजय जोशी) यांचे हे पाचवे पुस्तक आहे. अनेक नवोदित कवी कवयित्रीना विजोंनी वृत्तबद्ध काव्यरचना, गझल लेखन कार्यशाळेच्या माध्यमातून कवी, गझलकार म्हणून नावारूपास आणले आहेत. अशा अनेक कवी कवयित्रीना विजोंचे हे नवे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. विजोंच्या “वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न व्हावा यासाठी श्री.सुरेश देशपांडे कार्याध्यक्ष म.सा.प, उमा आवटेपुजारी उपकार्यवाह म.सा.प. व म.सा.प. कार्यकारिणीने आपणांस आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.