You are currently viewing माणुसकी प्रतिष्ठान आयोजित वेशभूषा स्पर्धेत कोलगाव येथील आराध्या परब प्रथम

माणुसकी प्रतिष्ठान आयोजित वेशभूषा स्पर्धेत कोलगाव येथील आराध्या परब प्रथम

सावंतवाडी

कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान व कोलगाव ग्रामस्थ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत आराध्या परब याने प्रथम क्रमांक पटकावला.

माही पडते हीने द्वितीय तर वेदश्री परब हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे अधीक्षक ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री. दुर्भाटकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून निधी नाईक तर दुर्वांश तर्फे यांनी क्रमांक पटकाविला विजेत्या स्पर्धकांचे वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा