You are currently viewing श्रीहरी

श्रीहरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री प्रज्ञा कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*श्रीहरी*

हसवतो रडवतो जगवतो श्रीहरी
घास घासातला पुरवतो श्रीहरी
पारिजातक जरी सत्यभामाकडे
पुष्प पडती तिथे राहतो श्रीहरी

दैन्य देतो तरी जगवणे जाणतो
दान देणे तिथे शिकवतो श्रीहरी
युद्धकाळात झाला जसा सारथी
श्रेष्ठ नाते पुढे जुळवतो श्रीहरी

विकृती जाळण्याला जगी नेहमी
चक्र हातातले फिरवतो श्रीहरी
मुक्त लीला करुन योग यागातुनी
आळसाला सदा हटवतो श्रीहरी

आंधळे पांगळे रूप घेऊनिया
भक्त त्याचा खरा निवडतो श्रीहरी
मोह माया नको गरजुला कर मदत
तुच्छ गर्वास मग हरवतो श्रीहरी

तळ मनाचा पहा सापडेना कधी
सावळा तो जरी भावतो श्रीहरी
भेद भावास जागाच देऊ नका
पूत्र पौत्रीमधे नांदतो श्रीहरी

सौ.प्रज्ञा कुलकर्णी
#राज्ञी
वसमत
जि.हिंगोली

प्रतिक्रिया व्यक्त करा