पंत्रप्रधान मोदी आज संध्याकाळी ६ वाजता देशवासीयांना संबोधित करणार…

पंत्रप्रधान मोदी आज संध्याकाळी ६ वाजता देशवासीयांना संबोधित करणार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. आज (मंगळवार) सायंकाळी ६.०० वाजता मोदी व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांना संबोधणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणणार? याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. खुद्द पंतप्रधानांनी याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक ट्विट करून दिलीय.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे नागरिकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं विषयावर बोलणार आहेत? याची उत्सुकता लागलीय.

 

देशाच्या करोना संक्रमणाच्या स्थितीबद्दल बोलायचं तर, गेल्या २४ तासांत करोना संक्रमणाचे ४६ हजार ७९१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ७५ लाख ९७ हजार ०६४ वर पोहचलीय. यातील ७ लाख ४८ हजार ५३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसंच गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण १ लाख १५ हजार १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा