You are currently viewing इचलकरंजीत धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन

इचलकरंजीत धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन

इचलकरंजी / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषद व इचलकरंजी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय शालेय
आयोजित धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी जिम्नॅशियम मैदानावर महापालिकेचे भांडार पर्यवेक्षक प्रताप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डिकेटीई संस्थेचे संचालक शेखर शहा , महापालिकेचे क्रीडा अधिकारी शंकर पोवार , सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख मान्यवरांनी खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करत खेळातील कौशल्य व गुणवत्ता सिद्ध करावी.तसेच शासकीय सेवेत संधी मिळण्यासाठी खेळातील चांगल्या कौशल्याचा मोठा उपयोग होत असल्याचे सांगून यांचे महत्व लक्षात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी
सरावात सातत्य ठेवावे ,आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे ,असे आवाहन केले.
यावेळी १४ ,१७ आणि १९ अशा विविध वयोगटात होणा-या धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी मोठी उपस्थिती दर्शवली.यावेळी खेळाडूंनी धनुर्विद्येचे उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थित क्रीडा शौकिनांची वाहवा मिळवली.यावेळी धनुर्विद्या खेळाचे प्रमुख शिवम स्वामी , महापालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक आकाश माने , पर्यवेक्षक सचिन खोंद्रे ,पंच विवेक परिट ,क्रांती पाटील यांच्यासह स्पर्धक ,क्रीडा शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा