You are currently viewing “श्री दत्तजयंती उत्सवामध्ये भक्तांना एकच सांगणे आमका तुमच्या पाया पडाचा” – गुरूदास माऊली

“श्री दत्तजयंती उत्सवामध्ये भक्तांना एकच सांगणे आमका तुमच्या पाया पडाचा” – गुरूदास माऊली

मुंबई

“आपल्या जीवन प्रवासात ४७ वर्षे राऊळ महाराज यांचा सहवास लाभला आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीतून घडलो म्हणूनच आपणास सांगू इच्छितो की, मनापासून गुरूची सेवा करा, म्हणजे प्रेमयुक्त भक्तीचा तुमच्यामध्ये अंतर्भाव झाल्यास तुमच्या मनातील समस्या सुटतील” असे श्री समर्थ सद्गुरु दत्तप्रसाद भक्त मंडळ मुलुंड पूर्व संचालक प.पू . श्री गुरुदास माऊली यांनी ३९ व्या श्री दत्तजयंती उत्सवामध्ये भक्तांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले केले. प्रतिवर्षाप्रमाणे गुरूस्थानी श्री दत्तजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री सत्यनारायण पूजेचे मान यजमान श्री व सौ. सुनिता श्रीकांत संगमेस्कर या दाम्पत्याला देण्यात आला होता. या प्रसंगी परमार्थ प्रदिप या दिनदर्शिकेचे प्रकाशन प .पू गुरूदास माऊली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुढे गुरूदास माऊली म्हणाले “राऊळबाबांच्या कृपेने ३९ वर्षं अध्यात्म सेवा केली. त्यात गुरूचरित्र दासबोध अध्याय याचं पठण करून नामस्मरण केल्यास आपल्यातील चैतन्य शक्ती वाढवण्यास मदत होते. शेवटी एकच लक्षात घ्या, ‘ आमका तुमच्या पाया पडाचा! आणि आपलं जीवन व्यतीत करा” असे नमूद केले. दत्त -जन्मच्या वेळी ज्योती सावंत, प्राची कांदळगावकर , पल्लवी सावंत, मंगल आंगणे, नलिनी मगदूम, मनिषा कुंभार, प्रतिभा पडवळ, सरिता आंगणे, मंगल गवंडी
या भगिनींनी पाळणा गायन करून मंत्रमुग्ध केले. यावेळी आमदार मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक प्रभाकर दळवी, नंदकुमार वैती , प्रकाश गंगाधरे , सामाजिक कार्यकर्ते रवि नाईक आदींनी दर्शन घेऊन शुभेच्छा दिल्या. तर हा  रंगतदार उत्सवात आपल्या पहाडी आवाजात नंदेश संगमेसकर यांनी सुस्वर भजन गायले.  त्याला संगीत साथ वसंत घडशी यांची लाभली. शेवटी महाआरती व महाप्रसादाने उत्साहात सांगता झाली.
—————————————

फोटो कॅप्शन : परमार्थ प्रदिप दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना प. पू. गुरूदास माऊली छायाचित्रात दिसत आहेत.    -( छाया  प्रमोद कांदळगावकर)

प्रतिक्रिया व्यक्त करा