You are currently viewing बागायती शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करा…..

बागायती शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करा…..

अन्यथा आंदोलन अटळ – प्रमोद रावराणे.

वैभववाडी
एडगांव – वायंबोशी परिसरात गवारेड्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. काजू व इतर बागायतीचे गव्यांकडून नुकसान सुरू आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन देखील संबंधित प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. वनविभागने गव्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा. अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी दिला आहे.

गवारेड्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास संबंधित विभाग टाळाटाळ करत आहे. नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहेत. शेतकऱ्यांना वाली कोण ? नुकसानीला जबाबदार कोण? या गंभीर परिस्थितीकडे लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रमोद रावराणे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 2 =