You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थी व पालकांचे राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत सुयश

बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थी व पालकांचे राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत सुयश

बांदा

शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड आयोजित 13 व्या राज्यस्तरीय ऑनलाइन देशभक्ती पर गीत गायन स्पर्धेत गट क्रमांक एक मधून जिल्हा परिषद बांदा नं.1केंद्रशाळेतील समर्थ संदीप नार्वेकर याने परीक्षक निवडीतून राज्यात द्वितीय व सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याने प्रेक्षक व परीक्षक निवडीतून राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला‌ . तसेच शाळेतील पालक श्रद्धा संदीप नार्वेकर यांनी गट क्र. पाच मधून‌ परीक्षक निवडीतून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थी सर्वज्ञ वराडकर व समर्थ व श्रद्धा नार्वेकर या मायलेकाने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर , केंद्र प्रमुख संदीप गवस विस्तार अधिकारी दुवा साळगावकर यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर , सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर ,शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे,जागृती धुरी, शितल गवस, प्राजक्ता पाटील, रंगनाथ परब, जे.डी.पाटील, प्रशांत ‌पवार,गोपाळ साबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =