फणसगाव माध्य -व उच्च माध्यमिक विद्यालय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम
तळेरे:- प्रतिनिधी
फणसगाव विद्यालयची यशाची परंपरा उज्वल असून,सध्या विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून अनेक स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे असून, त्या माध्यमातून आपली शारीरिक क्षमता वाढवावी.कोणत्याही स्पर्धेत जिंकण्यासाठीच उतरा निश्चितच यश संपादन करता येईल असे आवाहन फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्यवाह संदेश नारकर यांनी विद्यार्थ्याला उद्देशून केले.
फणसगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
प्रसंगी व्यासपीठावर व्यासपीठावर संदेश तुकाराम नारकर प्रमुख कार्यवाहक फणसगाव शिक्षण संस्था मुंबई संचलित,विठ्ठलादेवी गावचे सरपंच दिनेश नारकर,विद्यालयाच्या
प्राचार्य सौ.पूजा कोरेगावकर ,सत्कारमूर्ती तथा कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, पत्रकार अनिल राणे यांच्या सह व्यासपीठावर प्राथमिक शिक्षक संतोष राणे,अमोल कांबळे, साईनाथ पूलचवाड, संजय खटावकर, मंगेश दहिफळे, सौ.प्रतिष्ठा तळेकर,सौ. दीप्ती लेले.इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्य कु.अलका नारकर सीनियर कॉलेज प्राचार्य सौ.कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.दरम्यान मान्यवरांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
त्यानंतर विद्यालयातील इ.१०वी ,इ.१२वी गुणवंत विद्यार्थी,कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी खेळाडूंचा आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि आकर्षक चषक व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तर शाळा समुह योजना अंतर्गत प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धेतील यशस्वीतांचाही आकर्षक फिरते चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
*गुणवंत शिक्षक पुरस्कारांने दत्तात्रय मारकड व विलास चव्हाण सन्मानित…*
कै. शिवानंद मलगोंडा जाधव यांच्या स्मरणार्थ श्री.मलगोंडा रामचंद्र जाधव यांच्याकडून प्रतिवर्षी फणसगाव, गवाणे, पेंढरी, मुटाट आणि कासार्डे हायस्कूल शाळांमधील इ.५वी ते ८ वी व इ.९वी ते १२वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या दोन गुणवंत शिक्षकांना “गुणवंत शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व फणसगाव ज्यु.कॉलेजचे प्रा.विलास चव्हाण यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.या दोन्ही गुणवंत सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन या पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ.पुजा कोरगावकर यांनी केले तर याप्रसंगी सरपंच दिनेश नारकर,अमोल कांबळे, सत्कारमूर्ती दत्तात्रय मारकड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विशेष कौतुक केले.
सूत्रसंचालन सौ.अरुंधती गोखले यांनी तर अहवाल वाचन विलास चव्हाण सौ.तृप्ती तावडे आणि सौ.प्राजक्ता नलावडे यांनी केले.आभार सतीश गावकर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.
फणसगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना संस्था पदाधिकारी संदेश नारकर, प्राचार्या कोरगावकर व अन्य मान्यवर