You are currently viewing इंडीयन मेडिकल असोसिएशन, पुणे संस्थेचा अवयवदान, देहदान यासाठी जनजागृती उपक्रम

इंडीयन मेडिकल असोसिएशन, पुणे संस्थेचा अवयवदान, देहदान यासाठी जनजागृती उपक्रम

पुणे-(प्रतिनिधी).

नुकताच इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे संस्थेने पुणे येथील IMA हाऊस ( डॉ.नीतू मांडके सभागृह, स्वारगेट) येथे अवयव दान आणि देहदान संबंधी एक जनजागृति कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमात अनेक डॉक्टर्स आणि नागरिकांनी भाग घेतला होता. IMA पुणेच्याअध्यक्षा डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. संजय पाटील, विश्वस्त IMA , माजी अध्यक्ष डॉ.अरूण हळबे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा.स्वाती दिवाण यांनी अवयवदानावर पोवाडा सादर केला. तर संत ज्ञानेश्वर नर्सिंग महाविद्यालयाच्या मुलींनी पथनाट्य सादर केले.
मा. विजया वेल्हाळ यांच्या तनिष्क ग्रुपने पथनाट्य सादर केले.
निगडी येथील शब्दरंग कला साहित्य कट्टा विषयावर अभिवाचन सादर केले . यामध्ये मा.चंद्रशेखर जोशी, प्रियांका आचार्य, सुभाष भंडारे ,ज्योती कानेटकर यांचा सहभाग होता.
अवयवदानावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्यात डॉ. हळबे, डॉ. मीनाक्षी देशपांडे, प्रिती म्हस्के, डॉ. वैशाली भारंबे, डॉ.शीतल महाजनी व श्रीकांत आपटे यांचा समावेश होता.
अवयव दान करणारे दाते व इतर सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता . डॉ गीतांजली शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी, उपस्थितांना अवयवदानावर शपथ देण्यात आली.या सर्व कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा