वेंगुर्ले
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर व जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्न देसाई यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक उत्तुंग , प्रखर बुद्धिमान , समाज उद्धारक , बहुपैलु व्यक्तीमत्वाचे महामानव होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय ज्ञानशास्त्रज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , तत्वज्ञ , राजनितीज्ञ आणि समाजसुधारक होते . भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते . भारतीय संविधानातील त्यांच्या अमुल्य योगदानामुळे त्यांना ” भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ” म्हटले जाते , असे प्रतिपादन जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांनी केले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, महीला मोर्चाच्या रसिका मठकर, अरुण ठाकूर, दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग, शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, वासुदेव पांगम, सई चेंदवणकर इत्यादी उपस्थित होते .