You are currently viewing 8 ते 10 डिसेंबर जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव

8 ते 10 डिसेंबर जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव

सिंधुदुर्गनगरी :

 

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव गुरुवार दिनांक 8 ते शनिवार 10 डिसेंबर या कालावधीत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आलेला आहे. या बाल महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.

       जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीसिंधुदुर्ग यांचे अधिनस्त शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृह सिंधुदुर्ग येथील अनाथनिराधारउन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व जिल्ह्यातील बाल संगोपन योजना लाभार्थी मुले व मुली तसेच अन्य मुले व या मुलांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कला व सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲङ संदेश तायशेटे,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ,बाल कल्याण समिती सदस्य सर्वश्री अॅड. अरुण पणदूरकर, अॅड. नम्रता नेवगी,प्रा.माया रहाटे, प्रा. अमर निर्मळे, न्यू इंग्लिश स्कूलओरोसचे मुख्याध्यापक अशोक रायबान, जिल्हा परिषद  शाळेच्या, मुख्याध्यापिकानिलम बोर्डवेकर यांची प्रमुख्य उपस्थित असणार आहे.

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवांचा पारितोषिक वितरण समारंभ व समारोप शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता  होणार असून यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कोकण विभागाचे महिला व बाल विकास विभागीय उपायुक्तबापूराव भवाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, डी. बी. म्हालटकर, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, बाल न्याय मंडळाचे सदस्य कृतिका कुबल व सुनिल खोत यांची प्रमुख उपस्थिती आहे.

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवात बालकांच्या विविध क्रीडा स्पर्धा, व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृहातील अनाथनिराधारउन्मार्गी व बाह्य शाळेतील बालकांचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी सहभाग घ्यावा. असे आवाहन शासकीय मुलांचे निरिक्षणगृह, बालगृहाचे अधीक्षक बी.जी. काटकर व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − five =