You are currently viewing आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या वतीने विद्याविहार इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालय, आरोसच्या सन २०२१/२२ च्या दहावी/बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या वतीने विद्याविहार इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालय, आरोसच्या सन २०२१/२२ च्या दहावी/बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

सावंतवाडी

विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्याल आरोस या ठिकाणी आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या वतीने गुरुवार दिनांक 01/12/2022 रोजी देवी माऊली जत्रोत्सवाचे औचित्य साधून मागील वर्षी सन २०२१/२२ मध्ये दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण होऊन पहिल्या तीन क्रमांक प्राप्त मुलांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. आरोस गावातील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल दरवर्षी लक्षणीय असा लागतो. मुलांच्या यशामुळे गावाचे नाव नक्कीच रोशन होते. त्यामुळे गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करणे म्हणजे पुढील पिढीला यशप्राप्ती साठी प्रोत्साहित करणे हे ध्येय समोर ठेऊन आरोस ग्रामस्थ मंडळाकडून यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला मंडळाचे सेक्रेटरी श्री सुनील नाईक, मंडळाचे उपाध्यक्ष श्री दयानंद नाईक, मंडळाचे सहसचिव श्री भाऊ मयेकर व मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री प्रसाद नाईक, शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव धुपकर सर, निलेश देऊलकर सर, सावंत सर, व शाळेची मुख्यमंत्री कुमारी अपूर्वा नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश देऊलकर सर यांनी केले. नंतर मंडळाचे उपाध्यक्ष श्री दयानंद नाईक व सेक्रेटरी सुनील नाईक यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व मुलांचे कौतुक केले तसेच मुख्याध्यापक श्री सदाशिव धुपकर सर यांनी मुलांना मार्गदर्शन करून आरोस ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या स्तुत्य उपक्रमासाठी आभार मानले व मंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा