You are currently viewing बहिणाई …….

बहिणाई …….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना

*बहिणाई …….*

बहिणाई बहिणाई तिची सरस्वती आई
मुखातून पडे ओवी शेत खुरपत जाई
बांध खुरपे खुरपे दु:ख डोळ्यात उतरे
बाता मारता देवाशी ओठातून ते पाझरे…

गेलं कपायचं कुकू देवा नशिब फुटलं
होय पाठीराखा देवा नातं तुझ्याशी जडलं
देई हातामध्ये बळ कष्ट कऱ्याची तयारी
हातपाय धड माझे मला कामाची उभारी…

नको सानुभूती मला देई कामाचे रे बळ
मुखी असो तुझे नाम पानातून सळसळ
पानातून वाऱ्यातून लागे चाहुल तुझीच
येती बोल गोड गोड झुळूझुळू वाऱ्यातून…

देवा दिसतो रे मला आजुबाजू वावरतो
वावरात पानातून बीजातून तू हासतो
तुझ्या सळसळ धारा वारा सुखवितो मला
रात्रीतून दिसती रे तुझ्या नानाविध कला….

मला कष्टाची धम्मक फक्त होई पाठीराखा
मला माहित आहे रे साऱ्या दुनियेचा सखा
तुझा भरोसा आहे बा मी घडेन नशिब
वाणी अमर बहिणा नावाजली जागोजाग..

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ४/११/२०२२
वेळ : सकाळी ११/५७

प्रतिक्रिया व्यक्त करा