You are currently viewing आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी यांची काव्यरचना

दिवस कसे हे नशीबी यावे, आयुष्याच्या संध्याकाळी
बळेच मी व्रुध्दाश्रमी जावे आयुष्याच्या संध्याकाळी

घरातल्या हसऱ्या ताऱ्यांना आकाश हे माझेच होते
मीच तयांना अडगळ व्हावे आयुष्याच्या संध्याकाळी

नातवंडांचे आईबाबा जोडणारा मी आजोबा
समुहातून त्या मज कमी करावे आयुष्याच्या संध्याकाळी

निरोप घेऊन बाहेर पडता दखलही ना घ्यावी कुणी
मम अश्रुंनी मज कुशल पुसावे आयुष्याच्या संध्याकाळी

व्रुध्दाश्रमी दाखल झालेले दुःख उगाळत बसलेले
दुःखालाचि सुख मानावे आयुष्याच्या संध्याकाळी

काळरुपी वाऱ्याने कधीतरी विझणार हा देह दिवा
वय झाल्याचे गीतं न गावे आयुष्याच्या संध्याकाळी

चंद्रशेखर धर्माधिकारी
वारजे पुणे©️

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 14 =