You are currently viewing सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात आढळला आणखीन एक मृतदेह…

सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात आढळला आणखीन एक मृतदेह…

युवक ओडीसा येथील असल्याचे झाले निष्पन्न

सावंतवाडी

सोनुर्ली येथे रेल्वेची धडक बसून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच परिसरात आणखीन एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटली असून तो ओडिसा येथील आहे. नाजू मलिक (२८) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक डुमिंग डिसोजा व मनीष शिंदे घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे. तर संबंधित व्यक्ती ही वेडसर होती. त्याला नातेवाईक रेल्वे मधून ओडिसा येथे नेत होते. मात्र वाटेतच चालत्या रेल्वेतून त्याने उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकार कुडाळच्या आसपास घडल्याचा अंदाज व्यक्त करत नातेवाईकांनी त्याठिकाणी बेपत्ताची खबर दिली होती. तर आज त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मृत युवक हा वेडसर असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. त्याला ओडिसा येथे नेत असताना त्याने चालत्या रेल्वेतून उडी टाकली होती. हा प्रकार कुडाळ परिसरात घडल्याचा अंदाज दाखवत नातेवाईकांनी त्या ठिकाणच्या पोलिसात याबाबतची खबर दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर संबंधित युवकाचा शोध घेतला. मात्र तो आढळून न आल्याने बेपत्ताची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तर आज त्याचा मृतदेह सोनुर्ली परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
दरम्यान याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर पुढील तपास करून “तो” मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

 

सावंतवाडी ता.०४-: सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात आणखीन एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. संबंधित युवकाची ओळख पटली असून तो ओडिसा येथील आहे.ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + one =