You are currently viewing “दिव्यांग”फिनिक्सची गगनभरारी..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

“दिव्यांग”फिनिक्सची गगनभरारी..

*वक्रतुंड साहित्य समूहाचे प्रमुख लेखक कवी श्री जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*

*”दिव्यांग”फिनिक्सची गगनभरारी…*

नित्यनेमाने, मनःशांतीसाठी,मंदिरात जायची सवय होती. नेहमीप्रमाणेच मंदिराच्या बाजुला असलेल्या फुलांच्या दुकानातुन हरफुलं घेत होतो अन् सहजंच बाजूला नजर गेली तर, एक होतकरू तरुण हातात हार घेऊन एका हातात काठीचा आधार घेऊन हारफुले विकंत असताना दिसला.जरा न्याहळुन बघीतलंं तर त्याचा एक पाय अधु असल्याचं जाणवलं..अन् त्याला आपल्याकडुन तेवढंच सहकार्य म्हणून त्यांच्याकडुन हारफुलं विकंत घेतली अन् देवदर्शन घेऊन बाहेर पडलो.. पन् त्या अधु विक्रेत्या तरुणाबंद्दल मला खुप आपुलकी वाटु लागली.. कारण शरिरानं अधु असुनही त्याची कष्ट करण्याची जिद्द माझ्या मनाला भावली. नविन विचार अन प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणादायी ठरली..

देवानं मनुष्याला जन्माला घातलं तेव्हा जन्माला आल्यावर संपूर्ण शरिर निरामय,अथवा अव्यंग असेलच हे सांगता येत नाही, जरी निरामय शरीर लाभलं तरी भविष्यात ते शरिर तसंच राहिंल हृयाची कुणालाही ग्वाही देता येणार नाही. कधीकधी परिस्थितीनं, अथवा दुर्घटनेमुळे शरिराला अपंगत्व किंबहुना दिव्यांगत्व येत असतं. म्हणून मनुष्याने आपल्या मानवबंधुबद्दल तिरस्कार आणि आपल्या शरिराबद्दल व्यर्थ अभिमान करणे चुकीचे आहे.. अनेक लोक असे आहेत की ते दिव्यांग व्यक्तीला घृणास्पद ,अपमानास्पद वागणूक देतात.किंवा, उपकाराची भावना किंवा सहानुभूती दाखवतात. पन् हे अगदी चुकीचे आहे. खरं तर जन्मत्: अथवा परिस्थितीमुळे दिव्यांगत्व प्राप्त झालेल्यांचे सहावे ज्ञानेइंद्रिय हे सामान्यापेक्षा जास्त विकसित असते.आपन सभोवतालच्या जन्मांध अथवा दिव्यांगाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल कि सर्व सामान्यांच्या तुलनेत ते शारीरिक क्षमतेपेक्षा त्यांची मानसिकता, अन्, बुद्धीमत्ता ही अफाट असते. अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे ते शारिरीक अक्षमतेच्या राखेतुन विलक्षण अशा बुद्धीमत्तेच्या सहायाने सर्व क्षेत्रात प्रगतीची गरुडझेप घेतात ..अन् ते सर्व दिव्यांग बांधव जगाचे कल्याण होईल असे कार्य करतात…

अशाप्रकारे आपल्या समाजात अनेक उदाहरणे आहेत की ते शरीराने दिव्यांग असुनही, दैवी बुद्धीमत्तेने परिपुर्ण आहे…

लुईस ब्रेन हा असाच ध्येयवेडा युवक, अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षी अंधत्व आलं अन् त्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. डोळे म्हणजे जिवनातील प्रकाश, पन् हा प्रकाशनचे नाहीसा झाला तर.. तर. संपुर्ण आयुष्याची कधीच न संपणारी काळोख रात्र..पन् हा वेडा जिद्दी तरुन मात्रा डगमगला नाही. त्याने एक सुसंवादासोबंत, लिखीत भाषाशैलीचा शोध लावला अन् ती लिपी म्हणजे ब्रेन लिपी. ब्रेन हे त्याचं नाव त्या ब्रेनलिपिशी जोडलं जावुन अंधांच्या दुनियेत प्रकाशाचं साम्राज्य निर्माण करणारा तो दिव्यांग, फिनिक्स पक्षाप्रमाणे अंधांच्या मनात गगनभरारी घेत आहेत….
दाक्षिणात्य अभिनेत्री,शास्त्रोक्त,नर्तकी जयश्री चंद्रा,ही लहानपणी अपघातात एका पायाने अधु झाली होती. पन् तिची न्रुत्य करण्याची महत्त्वाकांक्षा अफाट असल्याने तिने तशाही परिस्थितीत शास्त्रीय नृत्य शिकले.. अन्. कुत्रीम पायाने तिने न्रुत्यकला क्षेत्रांत नाव लौकिक मिळवलं…
जयचंद्रन प्रसन्ना,आणि मन्सुर अली खान ही दोन नावे क्रिकेट जगतातील आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. जयचंद्रन प्रसन्ना हा तरुन दिव्यांग असुनही फिरकी गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला अन् मन्सुर अलिखान हा एका डोळयाने अधु असुनही क्षेत्ररक्षक म्हणून नावारुपाला आला.. ..

खरं तर सर्वांगाची हालचालंच करु शकलो नाही तर.. तर ,तो मनुष्य काहींच करु शकत नाही.. ती व्यक्ती संपुर्णपणे पराधीन असते,अन् अशा अवस्थेत दैनंदिन शारिरीक हालचाली करणे तर सोडाच पन् मन ईतर गोष्टींचा विचारसुद्धा करु शकत नाही. पन् हे एका ध्येयवेड्या तुरुंणाने सहज शक्य केलं.एवढंच नाही तर त्याने अशक्य अशा “कृष्णविवरं”अशा भौगलीय शोधाचे जनक ठरला..त्यासोबत त्याने भौतिक शास्त्रातील गणितज्ञ म्हणून नावलौकिक मिळवले. तो तरुण म्हणजे,असामान्य बुद्धिमत्ता क्षमतेचा महामेरु.स्टिफन हॉकिंन… लहानपणींनच.” पॉरलिसीसचा” आजार झालेल्या ह्या मुलांची बौद्धिक क्षमता अफाट होती.अन,त्यामुळे आईवडिलांनी त्याला जिवापाड जपलं.. अन् त्याची शिक्षणाची आवड पुर्ण केली…संपुर्ण शरिराने अव्यंग, पन् मनानें, बुध्दीने संपूर्णपणे चैतन्यमयी असा हा “स्टिफन हॉकिंन, असामान्य अशा भौतिकशास्त्राचा गणितज्ञ, आणि कृष्णविवराचा जनक म्हणून जगांत प्रसिद्ध झाला..

अशा ह्या तेजस्वी दिव्यागांच्या तेजोमय कार्याच्या सन्मानासाठी, संयुक्त राष्ट्रसंघाने,३डिसेंबर १९९२ हा दिव्यांगदिन (अपंगदिन) म्हणून घोषित केला.. साधारणपणे १९८३ते ३डिसेंबर १९९२ हे दशक दिव्यांगाच्या विकासासाठी समर्पित केले गेले. त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी दिव्यांगाच्या सहकार्यासाठी किंबहुना त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत.खरं तर त्यांना वरवरच्या कोरड्या सहानुभूतीपेक्षा प्रोत्साहनाची गरज आहे.आर्थिक सहकार्य मिळाले पाहिजे.. त्या व्यक्ती अप्रतिम बुद्धिमत्ता व कल्पकतेच्या जोरावर समाजात सर्व क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकतात.अन शारिरीक क्षमतेच्या राखेतुन सर्वांगिण प्रगतीसाठी सर्वांच्यांच भल्या साठी,भव्य अशी झेप घेऊन प्रगतीची गगनभरारी घेतात..अशा ह्या सर्वंच दिव्यांग बांधवांना प्रेम आपुलकी अन् आर्थिक सहकार्य तसेच मानसीक प्रोत्साहनाचे बळ देवून अगदी मनापासून मानाचा मुजरा करायला हवा.. बरोबर ना??

©️श्री–जगन्नाथ खराटे- ठाणे
१डिसेंबर२०२२
.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =