You are currently viewing बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा उपसंघटक पदी नीलम शिंदे व संजना हळदिवे

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा उपसंघटक पदी नीलम शिंदे व संजना हळदिवे

मालवण

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा उपसंघटक पदी मालवण मधील नीलम शिंदे व कणकवली मधील संजना हळदिवे यांची निवड करण्यात आली आहे. नीलम शिंदे यांच्यावर मालवण कुडाळ तालुक्याची तर संजना हळदिवे यांच्यावर कणकवली वैभववाडी या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली असून देवगड तालुक्याची जबाबदारीही या दोघांवर एकत्रित रित्या सोपविण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जिल्ह्यातून विशेषतः मालवणात महिलांचा ओघ वाढत असून महिला संघटन वाढीसाठी व पदे भरण्यासाठी सक्षम महिलांची चाचपणी सुरू आहे. येत्या ३० डिसेंबरच्या आत जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला संघटनेतील सर्व पदांवर नियुक्त्या केल्या जातील अशी माहिती महिला जिल्हा संघटक वर्षा कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी वर्षा कुडाळकर म्हणाल्या, महिला जिल्हा संघटक पद स्वीकारल्यानंतर आपला हा पहिलाच दौरा असून जिल्ह्यात पक्षाच्या महिला संघटन वाढीसाठी व वरिष्ठांना अभिप्रेत काम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यातील महिला संघटनेची विविध पदे भरायची आहेत. ३० डिसेंबर पर्यंत ही पदे भरली जातील. पक्षासाठी वेळ देऊ शकणाऱ्या आणि सक्षमपणे काम करू शकणाऱ्या महिलांचा शोध आम्ही घेत असून अशा महिला विविध पदे दिली जातील. मालवण मध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची संघटना चांगली वाढली असून महिलांचा ओघही वाढत आहे. पक्षाच्या माध्यमातून महिलांना चांगले काम करण्याची संधी, योग्य ते मार्गदर्शन देण्यात येणार आहे, तसेच महिलांच्या बचत गटांनाही आवश्यक ते सहकार्य करून महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही यावेळी वर्षा कुडाळकर यांनी सांगितले.

मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी महिला जिल्हा संघटक वर्षा कुडाळकर, मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, नीलम शिंदे, सोनाली पाटकर, भारती घारकर, लुड्डीन फर्नांडिस, रिया आचरेकर, गीता नाटेकर, निकिता तोडणकर, कविता मोंडकर, पराग खोत, ऋत्विक सामंत आदी व इतर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 13 =