देवगड
कोरोना काळापासून पर्यटनाची व्याख्या बदलली आहे. भारतातील लोक देशा परदेशात न जाता स्थानिक पातळीवरच विविध प्रदेश पाहतात याचा फायदा सिंधुदुर्गला मिळाला पाहिजे. देवगड अशा पर्यटन स्थळांमध्ये दहा मध्ये एक आले पाहिजे यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. असे मत आमदार नितेश राणे यांनी देवगड येथे व्यक्त केले.
देवगड येथील बांगडा फेस्ट या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. यामध्ये बोलताना त्यांनी सिंधुदुर्गातील स्थानिक चवीचे महत्त्व विशद केले. परदेशातून येणाऱ्या नागरिकांना स्थानिक चव महत्त्वाचे असते. येथील पदार्थ व त्याची चव पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणार नाही. देशा परदेशातून आलेला पर्यटक या चवीसाठी सिंधुदुर्गात येतो. यासाठी पैसे मोजतो म्हणूनच स्थानिक पातळीवर यासाठी काम होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. होमस्टेची संकल्पना अद्यापही देवगड मध्ये रुजलेली नाही. ती रुजण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी आपली अपेक्षा आहे देवगड हे माझे कुटुंब असून यासाठी आपण सतत प्रयत्न करू असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी व्यापारी महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.