You are currently viewing मुलुंड (पूर्व )श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज गुरुस्थानी श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

मुलुंड (पूर्व )श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज गुरुस्थानी श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

मुलुंड (पूर्व )श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज गुरुस्थानी श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

मुंबई –

श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ, मुलुंड पूर्व गुरूस्थानी प्रतिवर्षा प्रमाणे श्री दत्तजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे मार्गशीर्ष शुद्ध १४ शके १९४४ बुधवार दिनांक ७ डिसेंबर २०२२रोजी सकाळी ८.३० ते रात्रौ दहा वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.नित्यानैमिक पूजनाने प्रारंभ करण्यात येणार असून श्री सत्यनारायण पूजा, श्री गुरुचरित्र पारायण, महाआरती, महाप्रसाद दुपारच्या सत्रात दासबोध, नामस्मरण, सुस्वर भजन, दत्त -जन्म , महाआरती महाप्रसादाने सांगता होईल.तरी डी / ५ औदुंबर सोसायटी, म्हाडा कॉलनी मुलुंड ( पूर्व)मुंबई -८१ येथे सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरी समस्त भक्त मंडळींनी उत्सवात सहभागी होऊन आनंदाची लुटी करावी असे आवाहन श्री समर्थ सद्गुरु गुरूदास माऊली श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा