You are currently viewing मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचं उद्या कणकवली पटवर्धन चौकात होणार जल्लोषी स्वागत…!

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचं उद्या कणकवली पटवर्धन चौकात होणार जल्लोषी स्वागत…!

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी,राजसाहेब प्रेमी जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे उपजिल्हाध्य दया मेस्त्री यांनी केले…!

कणकवली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत यात ते जिल्ह्यातील विविध ठिकाणचा पक्ष वाढीच्या दृष्टीने भागातील आढावा घेत असुन यासह आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांशी पक्ष बांधणी संदर्भात बैठका घेऊन चर्चा करणार आहेत

शुक्रवारी आई भराडी देवीचे दर्शन घेऊन राज ठाकरे यांचं कणकवली पटवर्धन चौकात आगमन होणार आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षप्रमुख राज ठाकरे यांचं जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी व प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधणार आहेत कणकवली देवगड वैभववाडी या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी पक्षवाढी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केले आहे

त्यानंतर संध्याकाळी खारेपाटण हॉटेल मॅंगो येथे वास्तव्य करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा