वर्धा
मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा वर्धा येथील अग्निहोत्री काॅलेज मधे दि.२७/११/२०२२ रोजी दिमाखदार पध्दतीने पार पडला.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डाॅ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे अध्यक्ष स्थानी होते.स्वागताध्यक्ष पद पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री,अध्यक्ष श्री महाकाली शिक्षणसंस्था यांनी भुषविले.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील गुणीजनांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
बदलापूरचे(जि.ठाणे) गझलकार/कवी *श्री यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे* यांना त्यांच्या *”ह्रदयातील सुगंधी जखमा* ह्या पहिल्याच गझल संग्रहास *”राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण”* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्व थरातून त्यांचे ह्या पुरस्कारासाठी अभिनंदन /कौतुक करण्यात येत आहे.
पुरस्कार सोहळ्या नंतर महाराष्ट्रातील आमंत्रित कवींच्या
पार पडलेल्या कवी संमेलनास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला
सदर कार्यक्रमाचे नियोजन वर्धा शहर अध्यक्षा लताजी हेडावू यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.