You are currently viewing इच्छुक असलो तरी, पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करेन

इच्छुक असलो तरी, पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करेन

*किरण सामंत यांचे सावंतवाडीत भव्य स्वागत*

 

*भंडारी समाजाच्या वतीने शहरात भव्य रॅली*

 

 

सावंतवाडी :

इच्छुक असलो तरी, पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करेन,अशी प्रतिक्रिया सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष किरण उर्फ भैया सामंत यांनी आज येथे दिली. दरम्यान किरण सामंत आज हे सावंतवाडी दौऱ्यावर आले असताना त्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले.

सामंत आज सावंतवाडी येथे भंडारी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेनिमित्त आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून भंडारी समाजाच्या बाईक रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान आज महिला दिनाच्या औचित्य साधून श्री सामंत यांनी महिलांना देखील शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलांची देखील लक्षणीय उपस्थित होती.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, रुपेश पावसकर, गजा नाटेकर, गुणाजी गावडे, योगेश नाईक, विनायक सावंत, महिला जिल्हाप्रमुख एडवोकेट नीता सावंत, अनोरजिन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, राजन पोकळे, प्रेमानंद देसाई, प्रसाद अरविंदेकर, सुधीर आडीवरेकर, जगदीश मांजरेकर आदी उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =