You are currently viewing फॅब्रीकेशचे साहित्य चोरणाऱ्या एकास अटक

फॅब्रीकेशचे साहित्य चोरणाऱ्या एकास अटक

इचलकरंजी

येथील सुफियान मुसा मुजावर (वय 37) यांच्या नदीवेस नाका परिसरातील फॅब्रीकेशन साहित्य असलेल्या पत्र्याच्या शेडचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी डल्ला मारला होता. याप्रकरणी 14 नोव्हेंबरला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीत सोहेल अब्दुल नदाफ (वय 26, रा. विक्रमनगर, इचल.) याला ताब्यात घेऊन कसुन तपास केला असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी इनव्हर्टर, ड्रील मशिन, ग्राईडर, ब्रेकर मशिन, केबल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 63 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा