कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा…..

कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा…..

– सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख

वेंगुर्ला
मागच्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
मार्च मध्ये लाॅकडाउन झाले सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यातच निसर्ग चक्रिवादळाने थैमान घातले यात बागायतदारांचे तसेच मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस चांगला झाल्यामुळे भातशेतीचे उत्पादन चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा होती परंतू गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणावर वारंवार यैणा-या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करावा व तातडीने शेतक-याना मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे करण्यात आल्याचे इर्शाद शेख यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा