You are currently viewing सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड येत्या ३० नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड येत्या ३० नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड येत्या दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाने निवडणूकीत विजय प्राप्त केला आहे.


भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाने पंधराही जागांवर एकतर्फी विजय प्राप्त केला असून शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला आहे.
या निवडणुकीत प्रमोद गावडे, प्रमोद सावंत,आनारोजीन लोबो,ज्ञानेश परब, प्रवीण देसाई, दत्ताराम कोळमेकर, विनायक राऊळ, आत्माराम गावडे, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, नारायण हिराप, भगवान जाधव, रश्मी निर्गुण, शशिकांत गावडे विजय प्राप्त केला आहे.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पदी प्रमोद गावडे यांच्या नावाची चर्चा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 15 =