You are currently viewing खारेपाटण विभागामध्ये शिवसेनेची नवी रणनीती

खारेपाटण विभागामध्ये शिवसेनेची नवी रणनीती

शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे .प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसनेने चांगली कंबर कसली आहे .आपल्या पक्षाच वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली .


खारेपाटण विभागामध्ये शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना भेटण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. संदेश पारकर यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कासार्डे विभागामध्ये कार्यकर्ते आणि उमेदवारांची भेटी घेतल्यानंतर पुन्हा खारेपाटण विभागांमधील वारगाव येथील उमेदवार व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आलीय. त्याचप्रमाणे या परिसरात भेटी घेण्याचा कार्यक्रम जोरात सुरू झालाय. तसेच शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर आणि कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून काही सूचना केल्या.यावेळी मधुकर वळंजू , महेंद्र केसकर, अरूण पांचाळ, अंजली पांचळ, दयानंद कुडतकर या भेटीदरम्यान अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 6 =