सोनू सावंत मित्र मंडळाचे आयोजन
कणकवली
आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठीच सोनू सावंत मित्र मंडळ वरवडे यांच्या माध्यमातून २७ नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेमध्ये आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन डॉ .सविता तायशेटे यांच्या हस्ते होणार असून या शिबीरासाठी प्रमुख उपस्थिति अतिरिक्त शल्य चिकित्सक सिंधदुर्ग डॉ. श्रीपाद पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग -डॉ.सूर्यकांत तायशेटे, डॉ. बी. जी. शेळके, डॉ. राम मेनन.
सर्जरी विभाग-डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. संदीप सावंत, डॉ. महेंद्र आचरेकर .ऑर्थो विभाग- डॉ.निलेश पाकळे, डॉ.शरण चव्हाण.स्त्री रोग विभाग- डॉ. ए. आर. नागवेकर, डॉ.सौ. अश्विनी नेवरे, डॉ. सौ.आचरेकर, डॉ. विशाखा पाटील.बालरोग विभाग-डॉ.प्रशांत मोघे, डॉ. नितीन शेट्ये, डॉ. आदित्य शेळके.
नेत्र विभाग-डॉ. प्रसाद गुरव, डॉ. राकेश बोरकर. कान नाक घसा विभाग- डॉ.श्रीपाद पाटील, डॉ. सौ. प्रीता नायगावकर, डॉ.ओंकार वेदक.दंतरोग विभाग डॉ. स्वप्नील राणे, डॉ. धैर्यशील राणे.
तसेच या शिबिरात रक्त तपासणी रक्तदाब पल्स एचबी युरीन संबंधित टेस्ट तसेच ईसीजी सुद्धा मोफत काढून मिळणार आहे या शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सोनू सावंत मित्र मंडळ वरवडे यांनी केले आहे