You are currently viewing नवनियुक्त युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत व मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सत्कार

नवनियुक्त युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत व मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सत्कार

मालवण

कुडाळ मालवण विधानसभा युवतीसेना समन्वयक पदी शिल्पा खोत व युवासेना मालवण तालुका समन्वयक पदी मंदार ओरसकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने काम करून युवासेना व युवतीसेना अधिक बळकट करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी,यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी,उपशहर प्रमुख सन्मेष परब, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, किरण वाळके,मनोज मोंडकर, विजय पालव,भाई कासवकर,अण्णा गुराम, भारती आडकर, मेघा शेलटकर, विष्णू लाड, यशवंत गावकर, मोहन मराळ, नरेश हुले, शशांक माने, कृष्णा पाटकर,राजेश गावकर, विनायक कोळंबकर, स्वप्नील आचरेकर, बाळ महाभोज
आदी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 3 =