ही मुजोरी न थांबल्यास विद्यालयीन मुलांना तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
सावंतवाडी
सावंतवाडी बस डेपो मधील काही मुजोर कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने कॉलेज विद्यार्थ्यांना घेऊन एसटी डेपो मॅनेजर गोधे यांना घेराव घालत धारेवर धरले. ही मुजोरी न थांबल्यास विद्यालयीन मुलांना घेऊन मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, साहिल तळकटकर, राकेश परब, केतन सावंत, ओमकार नवार, विशाल पंत, अमोल नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते
सावंतवाडी डेपोच्या सगळ्याच बसेस टाईमच्या एक दिड तासाने उशीरा सुटतात. उशिरा सुटत असल्याने या बसने प्रवास करणाऱ्या विद्यालयीन मुल, गरिब भाजी पाला घेऊन येणारे सर्वसामान्य लोक तसेच या गाड्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशाना नाहक त्रास होत आहे. मात्र विचारायला गेल्यास मुलांना उध्दट उत्तरे दिली जात आहेत. एका बस कंडाक्टरने तर एका मुलाना बस मध्येच मारण्याची धमकी दिली, त्यामुळे मुलांनी गोधेंना जाब विचारला. या बस डेपोतील उध्दट कर्मचाऱ्यांवर गोधे यांचा दाब नसल्याचेही सांगुन समजत नसेल तर पुढे मनसे आपल पाऊल उचलून कारवाई करेल व त्या कारवाईला पुर्णत: सावंतवाडी बस डेपो मॅनेजर जबाबदार राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.