You are currently viewing वर्दीतील स्त्रीशक्ती महिला पोलीस संगीता ढोले…

वर्दीतील स्त्रीशक्ती महिला पोलीस संगीता ढोले…

नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव….

मुंबई :

कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न ..

शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे,
भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत.
संगीता ढोले
वाशिम पोलीस (Washim Police) दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले या सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम करत आहेत. भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या ढोले यांचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे.
नवरात्र उत्सवाचे पवित्र पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. असे गौरोद्‌गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 5 =