You are currently viewing तुळस येथे २ जानेवारीला पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा…

तुळस येथे २ जानेवारीला पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा…

वेंगुर्ले

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग नवव्या वर्षी ०२ जानेवारीला सकाळी ठीक ९.३० वाजता श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थचे संस्थापक कै.रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृह) येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वक्तृत्व स्पर्धा खुल्या व शालेय मोठा गट व लहान गट अशा एकूण तीन गटात तर पाठांतर स्पर्धा (ई. चौथी पर्यंत) आयोजित केली आहे.


बऱ्या वाईट कुठल्याही प्रसंगातून आपले राजकीय स्वार्थ साधून घेत सत्ता मिळवण्याची स्पर्धा म्हणजे ‘राजकारण’, ही व्याख्या आता राजकारणात रूढ झाल्याने राजकारणी सत्ताप्राप्तीसाठी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवू लागले आहेत, स्वार्थी सत्ताकारण्याच्या राजकारणाने आता पातळी सोडली आहे,असे म्हणून त्याकडे किती दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणाची खालावत जाणारी पातळी कुठल्याही लोकशाहीवादी माणसाला चिंताजनक आहे यावर भाष्य करण्यासाठी खुल्या गटासाठी लोकशाहीचे वस्त्रहरण होत आहे का? असा वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे. थोर समजसेविका पद्मश्री सिंधुताई यांच्या संघर्षमय जीवनावर आणि व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्यासाठी शालेय मोठा गट (८वी ते १०वी) ‘अनाथांची माय सिंधुताई सपकाळ’ असा वक्तृत्व चा विषय आहे. तर शालेय लहान गट (७वी पर्यंत) साठी ‘ गुरू ईश्वर तात माय’ असा वक्तृत्व चा विषय आहे.


खुल्या गटासाठी किमान ८ मि. तर कमाल १० मि. वेळ ; तर शालेय गटासाठी किमान ५ मि. व कमाल ७ मि. एवढा सादरीकरणाचा वेळ आहे.आणि पाठांतर स्पर्धेसाठी गणपती स्तोत्र (संस्कृत) हा विषय आहे.
वक्तृत्व स्पर्धेतील खुला गट प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम ₹ १०००, ₹७००, व ₹ ५००, उत्तेजनार्थ १ व उत्तेजार्थ २ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर शालेय मोठ्या गटासाठी अनुक्रमे ₹७७७, ₹५५५, ₹३३३ उत्तेजनार्थ १ व उत्तेजार्थ २ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर शालेय लहान गटासाठी अनुक्रमे ₹५५५, ₹४४४,₹३३३ उत्तेजनार्थ १ व उत्तेजार्थ २ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र आणि संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेसाठी एकूण अनुक्रमे ५ क्रमांक असून भेटवस्तू,मेडल आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक स्वरूप असून सर्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
शालेय स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे शालेय ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी रोहन राऊळ (९२८४६९८९८१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =